⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बीएचआर प्रकरणात अडकणारा ‘तो’ आमदार कोण?

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यासह राज्यात आर्थिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने एकाच दिवशी छापेमारी करीत अनेक दिग्गजांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकरणाचा संबंध २०१६ च्या निवडणुका आणि एका आमदाराशी जोडला जात असून नेमका ‘तो’ आमदार कोण अशी विचारणा करणारे फोन खणखणत आहे.

राज्यात बीएचआरप्रकरणी एकाच दिवशी छापेमारी करून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे यापैकी काही जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय तर काही आमदार राजुमामा भोळे यांचे निकटवर्ती आहेत. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात आणखी नावे समोर येण्याची शक्यता असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील याबाबत सूतोवाच केले आहेत.

 दरम्यान, जिल्ह्यातील ‘तो’ आमदार कोण अशी चर्चा होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एक विद्यमान आमदार या प्रकरणात गुंतलेले असून ते कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे कळते. राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहे.

हे देखील वाचा : 

Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात

आमदार पोहचले जिल्हापेठ पोलिसात

Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

बीएचआर प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील मैदानात ; घरकुलप्रमाणे त्रयस्थ अर्जदार म्हणून याचिका दाखल करणार