बाजार समिती अपडेट : जळगावात महविकासची आघाडी, शिंदे-भाजपा पिछाडीवर

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० एप्रिल २०२३ | जळगाव जिल्ह्यातील ६ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणी आज पार पडत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये आता हाती आलेल्या अपडेटनुसार महविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून भाजपा पिछाडीवर आहे.

जळगाव बाजार समितीची मतमोजणी सुरू असून बाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत गटात पंकज पाटील – शिवसेना, मिलिंद चौधरी – भाजप, दिलीप कोळी – महाविकास आघाडी, रवी देशमुख – अपक्ष यांना मोठी आघाडी आहे.

सर्वसाधारण गटातून मनोज दयाराम चौधरी, लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर, सुरेश शामराव पाटील, सुनील सुपडू महाजन, योगराज नामदेव सपकाळे, प्रभाकर गोटू सोनवणे व शामकांत बळीराम सोनवणे हे विजयी झाले आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सुनील महाजन यांना सर्वाधिक ४६७ मते मिळाली आहेत.