गुन्हेजळगाव जिल्हा
जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात एकीकडे गुन्हेगारी वाढताना दिसत असून यातच एक खंडणीची घटना घडली आहे. आकाशवाणी ते इच्छादेवी चौकादरम्यान असलेल्या वाइन शॉप चालकाला चाकूचा धाक दाखवून खंडणी म्हणून दारूच्या तीन बाटल्या लंपास करण्यात आल्या. या खंडणीखोराला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली.
अशोका वाइन शॉपवर रविवारी दुपारी रिजवान गयासोद्दीन शेख (रा. तांबापुरा) हा आला. त्याने चाकू दाखवून शिवीगाळ करत ‘तुम्हाला दुकान चालवायचे असेल तर मला पैसे, दारूची बाटली द्यावी लागेल. नाहीतर जीवे ठार मारेल’ अशी अशी धमकी दिली. तसेच लिकर शॉपमधून दारूचा एक हाफ व दोन क्वॉटर पैसे न देता घेऊन गेला, अशी तक्रार लिकर शॉपचे कर्मचारी राजेश साधुराम कारडा यांनी दिली.
त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फुकटात खंडणी म्हणून दारू नेणाऱ्याला अटक झाली आहे.