⁠ 
रविवार, मे 12, 2024

जळगावचा पारा वाढला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ ।  राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय तर दुसरीकडे राज्यातील सर्वच भागात सूर्य आग ओकतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण, राज्यात आज तापमानाची नोंद पाहिली तर चंद्रपुरात तब्बल 42.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय.

दरम्यान, जळगाव शहरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. जळगावकरांच्या दरवर्षातील सवयीच्या उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. जळगावात आज  ४१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. त्यामुळे आतापासूनच जळगावकरांना उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मे मध्ये काय स्थिती असेल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याची जाणीव गेल्या चार दिवसांपासून जळगावकरांना होऊ लागली आहे. यंदा मार्च महिन्यात जिल्ह्यात बेमोसमी पाऊस व गारपीटचा तडाखा बसला. त्यानंतर आता गेल्या आठ दिवसात शहरासह जिल्ह्यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. येत्या काळात तापमान वाढण्याचे संकेतही आहेत.