जळगावचा पारा चाळीशीवर ; जिल्ह्यात मान्सून कधी दाखल होणार? वाचा बातमी

जून 10, 2025 9:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२५ । यंदा हवामानात बराच बदल दिसून आला. विशेष यंदा मे महिना काहीअंशी ‘ठंडा ठंडा कुल-कुल’च राहिला. मे महिन्यात तब्बल २६ दिवस तापमानाचा पारा ४० अंशाच्या खाली राहिला होता. मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने जळगावातील तापमानाचा पारा ४० अंशावर पोहचला आहे. यामुळे असह्य उकाडा जाणवत असल्याने जळगावकर हैराण झाला आहे. दरम्यान खान्देशासह जळगाव जिल्ह्यात मान्सून १५ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता स्थानिक हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

tapman 3

सोमवारी जळगाव शहराच्या तापमानाची नोंद ४०.६ अंश इतकी करण्यात आली. त्याआधी ५ मे रोजीच पारा ४० अंशावर पोहचला होता. त्यानंतर जळगाव शहराचे तापमान ४० अंशाच्या खालीच राहिले. मे महिन्यात बहुतांश दिवस ढगाळ वातावरण व पावसाचे राहिल्यामुळे यंदा ‘मे हिट’ जाणवलाच नाही.
आता जून महिन्यातील काही दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे तापमानात वाढ होत आहे. सोमवारी पारा ४० अंशावर पोहोचला होता.

दुपारच्या वेळेस तर सूर्य आग ओकत असून असह्य उकाडा जाणवत आहे,. यामुळे मान्सून पाऊस कधी हजेरी लावणार याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान खान्देशासह जळगाव जिल्ह्यात मान्सून १५ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता स्थानिक हवामान अभ्यासकांननी वर्तवली आहे.

आगामी पाच दिवस कसे राहणार वातावरण
दिनांक… तापमान.. वातावरणाची स्थिती
१० जून : ३९ अंश….. काही अंशी ढगाळ हवामान
११ जून : ४० अंश….. काही अंशी ढगाळ हवामान, उकाडा अधिक जाणवणार
१२ जून : ३८ अंश….. ढगाळ वातावरण, उकाडा कायम
१३ जून : ३८ अंश….. तुरळक पाऊस, ढगाळ वातावरण
१४ जून : ३८ अंश….. तुरळक पाऊस

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment