जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी चालून आलीय. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी ही भरती निघाली असून यासाठी इच्छुक उमेदवार ITBP recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२५ आहे. ITBP Recruitment 2025

ITBP ने क्रीडा कोट्याअंतर्गत 133 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. या भरती प्रक्रियेतून गुणवंत खेळाडूंची भरती केली जाणार आहे. क्रीडा कोट्यातील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत आणि अर्जदारांची निवड कशी केली जाईल? हे जाणून घेऊ. ITBP Bharti 2025
पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.या पदासाठी अर्ज करण्यासाठी वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. वयाची गणना ३ एप्रिल २०२५ पासून म्हणजेच ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पासून केली जाईल.
क्रीडापटू, जलतरणपटू आणि नेमबाजीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले खेळाडू या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला अर्जदारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलीय. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 – ते 69,100 पर्यंत दरमहा पगार मिळेल.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत, अधिसूचनेत दिलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या किंवा पदके जिंकलेल्या खेळाडूंच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
ज्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज योग्य आढळले आहेत त्यांना भरती प्रक्रियेसाठी म्हणजेच कागदपत्रे, शारीरिक मानक चाचणी (PST) आणि तपशीलवार वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाइन प्रवेशपत्रे दिली जातील. वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर माहिती उपलब्ध असेल.
मी 10 पाच आहे मला नोकरी हवी आहे