जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२१ । राज्यात काही भागात पुढील आठवड्यात पुन्हा अवकाळीचा शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. बदलत्या हवामानामुळे गेल्या काही दिवसापूर्वी थंडी वाढली होती. परंतु नंतर थंडीची तीव्रता कमी झाली. मात्र येत्या रविवारनंतर अधिक वाढणार आहे. शनिवारपासूनच उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांचा वेग ताशी १७ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता अाहे. रविवारी किमान तापमान अवघ्या ८ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात विशेषत: जळगाव जिल्ह्यात बुधवारी किमान तापमान १२.२ अंशांवर हाेते. वाऱ्याचा वेग ताशी ५ ते ६ किलाेमीटर असल्याने दुपारी ३० अंशांपर्यंत वाढलेल्या कमाल तापमानामुळे उन्हाचा चटका जाणवत हाेता. गुरुवारपासून वाऱ्याचा वेग वाढेल. शुक्रवारी ताशी ११ किमी, शनिवारी १३ किमी तर रविवारी वाऱ्याचा वेग ताशी १६ ते १७ किमीपर्यंत वाढू शकताे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रविवारी दिवसाही गारठा जाणवेल.

त्यामुळे कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस ते किमान तापमान ८ अंश सेल्सअसपर्यंत राहणार आहे. दाेन दिवस या वाऱ्यांचा प्रभाव असेल. पुढील आठवड्यात पुन्हा तापमानात वाढ हाेऊन थंडीची तीव्रता कमी हाेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान ‘जिगीषा नाट्यसहवास’ चे आयोजन
- JEE अॅडव्हॉन्समध्ये ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’












