सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही – एकनाथराव खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही असे एकनाथराव खडसे म्हणाले आहेत. सध्या सरकार अधांतरी आहे. अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल यावरूनच सगळं ठरेल. सरकारची निश्चिचता, अनिश्चितता कोर्टाच्या निर्णयावर आहे. असे यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले.
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये असंतोष पसरला तर सरकारला त्यावेळीही धोका पोहचू शकतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला संधी देणे अवघड आहे. पर्यायी सरकार पडू शकते असेही खडसे म्हणाले.
याच बरोबर काही दिवसांपूर्वी ते असेही म्हणाले होते कि, शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाची कायदेशीर लढाई सुरू आहे. मात्र ते आता गोठवण्यात आले आहे. मात्र एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना ही संघाची असल्याचा योग जुळून येत असल्याचे ते म्हणाले.
तर एकंदरीतच शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून महाराष्ट्रातल राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली होती.