दिवाळीपूर्वी 54 हजार शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ – खा. रक्षा खडसेंची माहिती

नोव्हेंबर 3, 2023 4:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२३ । पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२२ मध्ये एकूण ७८००० शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित असलेल्या ५४००० शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच येत्या ४-५ दिवसात थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.

pik vima jpg webp

आपल्या पिका विमा उतरविलेल्या एकूण ७८००० शेतकऱ्यांपैकी ५४००० शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार असून, ११००० शेतकऱ्यांनी पिक नलावता विमा उतरविलेला असल्याचे तसेच १३००० शेतकऱ्यांनी अधिकचा म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढलेला असल्याचे पिक विमा कंपनीच्या सर्वेक्षणात आले असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. तसेच त्यांनी योग्य पद्धतीने विमा उतरविलेला असून, त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही, अश्या शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील कृषी कार्यालय येथे सर्व पुराव्यासह अर्ज सादर करावा अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली.

केळी विमा पात्र महसूल मंडळ-
1) रावेर – खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा, रावेर, खानापुर, ऐनपुर
2) चोपडा – अडावद, लासूर, धानोरा प्र.चोपडा, गोरगावले, हातेड बु., चाहर्डी
3) मुक्ताईनगर – घोडसगाव, अंतुर्ली, कुऱ्हा, मुक्ताईनगर
४) यावल – भालोद, साकळी, किनगाव बु., बामनोद, यावल, फैजपुर,
५) भुसावळ – वरणगाव, पिंपळगाव खु., भुसावळ
६) जामनेर – नेरी, शेंदुर्णी, मालदाभाडी, जामनेर, पहूर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now