नोकरी संधी

10वी, ITI उत्तीर्णांसाठी खुशखबर! ISRO च्या यूआर राव उपग्रह केंद्रात मोठी पदभरती..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इस्रोच्या यूआर राव उपग्रह केंद्रात (URSC) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष या भरतीसाठी १०वी उत्तीर्णांसह आयटीआय उमेदवारांना नोकरीची मिळविण्याची मोठी संधी आहे.

या भरतीअंतर्गत टेक्निशियन-बी आणि वाहनचालक अशा एकूण ६१ पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ नोव्हेंबर २०२६ आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

या भरतीमध्ये टेक्निशियन-बीच्या विविध ट्रेडमधील ४६ पदे आणि वाहनचालकांची १५ पदे भरली जाणार आहेत.

टेक्निशियन-बी (इलेक्ट्रॉनिक्स संबंधित ट्रेड) – २४ जागा

टेक्निशियन-बी (फिटर) – ८ जागा

टेक्निशियन-बी (इलेक्ट्रिशियन) – ४ जागा

टेक्निशियन-बी (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) – ५ जागा

टेक्निशियन-बी (टर्नर) – १ जागा

टेक्निशियन-बी (मशीनिस्ट) – २ जागा

टेक्निशियन-बी (मोटर व्हेईकल मेकॅनिक) – १ जागा

टेक्निशियन-बी (इलेक्ट्रोप्लेटर) – १ जागा

लाइट व्हेईकल ड्रायव्हर-ए – ३ जागा

स्टाफ कार ड्रायव्हर-ए – २ जागा

हेवी व्हेईकल ड्रायव्हर-ए – १० जागा

शैक्षणिक पात्रता काय?

टेक्निशियन-बी पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्रासह NTC किंवा NAC यांसारखी अधिसूचनेत नमूद केलेली पात्रता आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, टर्नर, मशीनिस्ट, मोटर व्हेईकल मेकॅनिक आणि इलेक्ट्रोप्लेटर या ट्रेडमधील उमेदवारांना त्यांच्या संबंधित पदांसाठी अर्ज करता येईल.

वाहनचालक पदांसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लाइट व्हेईकल ड्रायव्हर आणि स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी वैध हलके वाहन चालविण्याचा परवाना आणि किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. हेवी व्हेईकल ड्रायव्हर पदासाठी वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना आणि किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

१३ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना तीन वर्षांची वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. इतर लागू सवलतींसाठी अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क आणि परताव्याची माहिती

या भरतीसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. दिलेल्या माहितीनुसार, लेखी परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर सर्वसाधारण आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये, तर SC/ST, माजी सैनिक (ExSM) आणि महिला उमेदवारांना ५०० रुपये परतावा मिळणार आहे. शुल्क भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील नियम तपासावेत.

अर्ज कसा कराल?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यूआर राव उपग्रह केंद्राच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, वाहनचालक पदांसाठी परवाना आणि अनुभवाची कागदपत्रे तयार ठेवावीत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button