⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | तांत्रिक बिघाडामुळे IRCTC ची वेबसाईट अन् अ‍ॅप बंद ; पैसे कापूनही तिकीट आरक्षित होईना..

तांत्रिक बिघाडामुळे IRCTC ची वेबसाईट अन् अ‍ॅप बंद ; पैसे कापूनही तिकीट आरक्षित होईना..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२३ । ऑनालाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  मंगळवारी प्रवाशांना IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन) वर रेल्वे तिकीट बुक करण्यात अडचणीचा सामना करावा लागला. तिकीट बुकिंग आणि पैसे भरताना प्रवाशांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पैसे कापूनही त्यांची तिकिटे आरक्षित होत नसल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आयआरसीटीसीचे म्हणणे आहे. प्रवाशांना आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइट दोन्हीवर समस्या येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

IRCTC ने ट्विट करून सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले आहे. आयआरसीटीसीने सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करत आहे. तांत्रिक समस्या दूर होताच आम्ही तुम्हाला कळवू.

आयआरसीटीसीने सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे आयआरसीटीसी साइट आणि अॅपवर तिकीट सेवा उपलब्ध नाही. तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करत आहे. वैकल्पिकरित्या Amazon, Makemytrip सारख्या इतर B2C प्लेयर्सद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात.

तिकीट बुक करू शकत नसल्याच्या तक्रारीही युजर्स करत आहेत. अभिलाष दहिया नावाच्या युजरने लिहिले, ही समस्या लवकर सोडवा. मी सतत तिकीट काढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र असे होत नाही. माझे पैसेही ५ वेळा कापले गेले, पण तिकीट काढले जात नाही. युजरने त्याचा स्क्रीन शॉटही शेअर केला आहे.

आणखी एका युजरने आयआरसीटीसीवर प्रश्न उपस्थित केला आणि विचारले की जर तांत्रिक बिघाडामुळे तिकीट बुक केले जात नाही, तर ही समस्या दूर होईपर्यंत ती का थांबवली जात नाही? लोकांचे पैसे सातत्याने कापले जात आहेत, मात्र तिकीट काढले जात नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.