iPhone 12 वर मिळवा 26 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट! ही ‘सुवर्ण संधी’ चुकवू नका

जुलै 22, 2022 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । अ‍ॅपल स्मार्टफोन्सबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे, परंतु हे प्रीमियम स्मार्टफोन खूप महाग असल्यामुळे प्रत्येकजण ते खरेदी करू शकत नाही. मात्र तुम्ही तुम्ही फ्लिपकार्टच्या या ऑफरचा लाभ घेऊन स्वस्तात iPhone खरेदी करू शकतात. होय फ्लिपकार्टवर iPhone 12 वर तब्बल 26 हजारांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

iphone 12 jpg webp

iPhone 12 वर प्रचंड सवलत मिळवा
Apple ने iPhone 12 च्या 256GB वेरिएंटचा फोने 80,900 रुपये किमतीत लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन तुम्हाला Flipkart वर 17% म्हणजेच 13,901 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 66,999 रुपयांना विकला जात आहे. हा फोन खरेदी करताना तुम्ही काही निवडक बँकांच्या कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. अशा प्रकारे तुम्ही iPhone-12 65,999 रुपयांना खरेदी करू शकाल.

एक्सचेंज ऑफर
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही iPhone 12 80,900 रुपयांऐवजी 65,999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात iPhone 12 विकत घेतल्यास तुम्ही आणखी 11,500 रुपये वाचवू शकता. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्हाला iPhone 12 वर एकूण 26,401 रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे तुम्ही हा Apple फोन 54,499 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

iPhone 12 ची वैशिष्ट्ये
या डीलमध्ये iPhone 12 च्या 64GB स्टोरेज वेरिएंटबद्दल बोलले जात आहे. A14 बायोनिक चिपवर काम करणाऱ्या या iPhone मध्ये तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, जे दोन्ही 12MP सेंसरचे आहेत. तसेच, सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी यात 12MP फ्रंट कॅमेरा आहे. 5G सेवांना सपोर्ट करणारा, हा Apple iPhone 6.1-इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो आणि हा ड्युअल सिम फोन आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now