ऑटोरिक्षांना मीटर बसवा : थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री व मुख्य सचिव यांना गुप्ता यांचे साकडे

नोव्हेंबर 12, 2021 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । शहरातील ऑटोरिक्षा विना मीटर धावत असल्याने या ऑटोरिक्षांचालक नियमांचे उलंघन करत आहेत. अशा ऑटोरिक्षा चालकांना नियमानुसार मीटर रीडिंगप्रमाणे भाडे घेणे सक्तीचे करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे.

gupta png

सविस्तर असे की, शहरातील ऑटोरिक्षा विना मीटरच्या धावत आहेत. या रिक्षांना मीटर लावण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता केली होती. यानंतर रिक्षाचालकांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मीटरप्रमाणे भाडे आकारणे (घेणे) बंधनकारक करत दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश काढले आहेत.

परंतु ,हा आदेश देवून जवळपास १० दिवस उलटली असतांना शहरात मीटरप्रमाणे भाडे आकारणी सुरु झालेली नसल्याचे सर्वसामन्य प्रवशांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री  व मुख्य सचिव यांच्याकडे गुप्ता यांनी तक्रार केली आहे.  यात शहरातील ऑटोरिक्षा विना मीटर धावत असल्याने या ऑटोरिक्षांचालक नियमांचे उलंघन करत आहेत. अशा ऑटोरिक्षा चालकांना नियमानुसार मीटर रीडिंगप्रमाणे भाडे घेणे सक्तीचे करावे अशी मागणी केली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now