⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

इंस्टाग्रामच्या लव्हस्टोरीने केला घात, नागपूरच्या तरुणीवर अत्याचार अन् फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । इन्स्टाग्रामवरुन ओळखी होवून दोघांमध्ये प्रेम बहरले. याच प्रेमप्रकरणातून जळगावातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवित नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महिने तरुणीवर शारिरीक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी तरुणीच्या फिर्यादीवरुन तरुणाविरोधाता गुन्हा दाखल होवून शहर पोलिसांनी गेंदालाल मिल येथील संशयित तरुणाला अटक केली आहे.

दानिश मुलतानी रा. गेंदालाल मिल असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. पिडीत तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २०२१ मध्ये दिवाळीमध्ये तीची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश मुलतानी याच्यासोबत ओळखी झाले. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. यादरम्यान तरुणीचे तिच्या समाजाच्या तरुणासोबत लग्न ठरले. यादरम्यान दानिश याने तरुणीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवित दानिश याने वेळावेळी नागपूरातील लॉज, तसेच जळगावात तरुणीवर शारिरीक अत्याचार केले. ४ एप्रिल रोजी तरुणी जळगावात आली. दानिशच्या कुटुंबियांना भेटली ७ एप्रिल पर्यंत ती जळगावात राहिली. त्यानंतर दानिशच्या मित्रांनी तिला एकटेच मलकापूर येथे एकटेच सोडले. तरुणी कशीतरी नागपूरातील तिच्या मावशीकडे पोहचली. यादरम्यान तरुणीने दानिशला फोन केले. व घ्यायला यायला सांगितले. मात्र त्याने येण्यास नकार देत, उलट तरुणीला जळगावात बोलाविले.

तरुणीला जळगावात बोलावले अन् फोन केला स्विच ऑफ
तरुणी एकटीच जळगावात आली. यादरम्यान दानिशने त्याचा फोन बंद करुन ठेवला. फोन लागत नसल्याने तरुणी जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाजवळ पोहचली. दानिशसोबत संपर्क होत नसल्याने तरुणील हताश झाली व याच ठिकाणी रडत बसली. तिच्याकडे काही तरुणांचे लक्ष गेले. तरुणांना तरुणीने आपबिती कथन केली. त्यानंतर तरुणांनी तिला एका समाजसेविकेकडे नेले. समाजसेविकेच्या माध्यमातून तरुणी फसवणूक झाल्याने तक्रारीसाठी शहर पोलीस ठाण्यात पोहचली. तरुणीच्या तक्रारीनुसार शहर पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होवून काही तासातच तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित दानिश यास गेंदालाल मिलमधून अटक केली. पुढील तपास सुरु आहे.