जळगाव व पाचोरा रेल्वे लाईनचे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून निरीक्षण!
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । जळगाव व पाचोरादरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून निरीक्षण करण्यात आले. मुख्य सुरक्षा अधिकारी यांची विशेष गाडी भुसावळ येथे सकाळी ५:३० मिनिटांनी पोहचली. ८वाजता जळगाव साठी निघाली, ३लाईनवर आल्यानंतर विशेष गाडी म्हसावाद येथे निघाली, ६ मोटर ट्रॉली ने सर्व अधिकारी निरिक्षणासाठी निघाले.
मुख्य सुरक्षा अधिकारी मनोज अरोरा यांनी निरीक्षण 1-1 किलोमीटर अंतरावर निरीक्षण केले. यावेळी पूलाचे निरीक्षण केल्यानंतर काही महत्वपूर्ण सूचनाही करण्यात आल्या. गुरुवारी पहिल्या दिवशी भुसावळ-माहिजीपर्यंत निरीक्षण करण्यात आले तर शुक्रवारी माहिजी ते पाचोरा दरम्यान निरीक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान, या निरीक्षण अहवालानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी भुसावळसह मुंबईतील सहा अधिकार्यांच्या चमूद्वारे ट्रॉलीत बसून प्रत्येकी एक-एक किलोमीटर अंतरापर्यंत निरीक्षण केले तसेच रेल्वे रूळासह अन्य बाबींबाबत संबंधित अधिकार्यांना मार्गदर्शन करीत सूचनाही केल्या. हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यास प्रामुख्याने मालगाड्यांसाठी तो वापरला जाणार आहे.