बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

हे कसले पोलादी पुरूष? हे तर.. जळगावात उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार प्रहार

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते जळगावमधील महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात फौजा घुसवल्या आणि मराठवाडा महाराष्ट्रात समील करून घेतला होता. आज आपण त्यांचे पुतळे उभारतोय. कारण ते खरे पोलादी पुरुष होते. वल्लभभाईंनी मराठवाड्यात जशी कारवाी केली. तशी मणिपूरममध्ये कारवाई करायची यांची हिंमत होत नाही. हे स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेत आहेत. हे कसले पोलादी पुरूष? हे तर तकलादू पुरूष आहेत. यांच्या कारभाराचा सोक्षमोक्ष लावायचा आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी भारत या शब्दावरून भाजपवर टीका केली. आज भारत बोललं पाहिजे. कारण इंडियाची काही लोकांना अलर्जी आहे. इंडिया बोलल्यावर काहींना खाज सुटायला लागली. आपण इंडिया म्हटल्यावर खाज सुटली. नाही तर व्होट फॉर इंडिया म्हणायचे, असा चिमटाही त्यांनी काढला.