⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महागणपतीला अकरा लीटर अत्तर, गुलाबजलाचा अभिषेक

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । श्री सिद्धिविनायक वेंकटेश देवस्थान जळगावच्यावतीने पाळधी येथे गणपती बाप्पाची ३१ फुटी उंच भव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. प्रतिष्ठापनेच्या सहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात तब्बल आकरा लिटर अत्तराने व गुलाबजलाने बाप्पाला अभिषेक करण्यात आला.(mahaganpati paldhi)

मंगळवार दि.७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा प्रतिष्ठापनेचा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. तब्बल सोळा दिवस चालणाऱ्या या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात नऊ अग्निकुंड धगधगत असणार असून दोन लाख ५१ हजार आहुती अर्पण करण्यात येणार आहे. याचबरोबर सोळा ही दिवस भक्तांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

प्रतिष्ठापनेच्या सहाव्या दिवशी तब्बल अकरा लिटर अत्तर आणि गुलाबजलाने गणपती बाप्पाला अभिषेक करण्यात आला. भारतातील प्रसिद्ध ज्योतिषी देव नायकाचार्य देवीलाल शास्त्री यांनी आज बाप्पा समोर नतमस्तक होत होम हवन केला. याचबरोबर इतर विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी झाले.

सुमारे दहा ते पंधरा हजार भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावत महाप्रसादाचा आनंद घेतला. मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त बाप्पाच्या भक्तीतलीन होण्यासाठी या ठिकाणी येत असून अजून मोठ्या प्रमाणावर बाप्पाच्या भक्ती तल्लीन होण्यासाठी या ठिकाणी यावे अशी विनंती श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान मंदिर आयोजकांनी केली आहे.