⁠ 
रविवार, मे 19, 2024

गांधीपुरा भागावरील अन्याय आता सहन केला जाणार नाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । आगामी एरंडोल नगरपालिका निवडणूकीची वारे वाहू लागले असून सक्षम उमेदवारांसाठी डावपेच सुरू झाले असून 2/3 पॅनल सर्वशक्तीने निवडणूकीसाठी सज्ज असल्याची चर्चा असतांनाच गांधीपुरा भागातील निवडणूक सोपी असल्याच्या भावनेतूनच शहरातील उमेदवार इच्छूक असल्याची चर्चा रंगू लागली असली तरी गांधीपुरा भागावरील अन्याय आता यापुढे कदापी सहन केला जाणार नाही असा इशारा शहरवासियांनी दिला असून त्यासाठी गांधीपुरा विकास आघाडीची स्थापना करून सर्वसमावेशक पॅनलद्वारे सक्षम उमेदवार देणार असल्याची चर्चारंगू लागली असून बैठकांद्वारे, चर्चेद्वारे विचारविनीमय सुरू आहे.

एरंडोल नगरपालिका क वर्ग नगरपालिका असली तरी अंजनी नदीमुळे शहराचे गांधीपुरा आणि एरंडोल असे दोन भाग झालेले आहेत. एरंडोल शहर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सहा नगरसेवक (कदाचित आता वाढण्याची शक्यता) गांधीपुरा भागातून निवडून दिले जातात तरीही अनेक बाबतीत अन्यायच केला जातो अशी या परिसरातील नागरीकांची भावना असून ती अनेक बाबतीत खरी देखील आहे. शहरातील उमेदवार पैशांच्या जोरावर गांधीपुरा भागातून निवडून येवून देखील नेहमी अन्यायच पदरी पडला आहे.

त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत गांधीपुरातीलच उमेदवार गांधीपुरा निवडणूकीत दिला जाणार आहे. उशिरा का असेना परंतू अशा प्रकारची जाणीव होणे देखील गरजेचेच होते. त्यामुळे आता आगामी निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.