महागाईचा चटका : बाजारात बाजरीची किंमत महागली
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । सध्या वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच कंबरड मोडल आहे. असं असताना आता बाजरीची भाकर सुद्धा महाग झाली आहे. बहुतांश घरांमध्ये गव्हाच्या चपात्या बनतात तरी देखील बाजरीची भाकर देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक खातात. अशावेळी हीच बाजरीची भाकर महाग झाली आहे.
बाजरीचे भाव वाढून तब्बल 2700 प्रतिक्विंटन झाले आहेत. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजरीला मोठी मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या गोष्टीमुळे बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील विविध भागातून येणाऱ्या बाजरीचे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. बाजरी बाजारात मिळत नाहीये यामुळे भाव वाढल्याचे म्हटले जात आहे.
जळगावातील बाजारामध्ये राजस्थान सह नाशिक व राज्यातील इतर भागातून बाजरी येत असते. मात्र तिचे नुकसान झाल्याने सध्या भाव वाढले आहेत. याचबरोबर हिवाळ्यात बाजरीची मागणी ही वाढते. मात्र, वाढलेली मागणी आणि कमी असलेला साठा लक्षात घेता ही भाववाढ झाली आहे. जळगाव बाजारपेठेमध्ये बाजरी 32 रुपये किलोने विकली जात आहे.