⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

महागाईचा चटका : मसाल्याचे दरही वाढले

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्के दरवाढ झाली आहे. हळद, जिरे, धणे, लवंग, बडीशेप, लाल तिखटाच्या भावातही वाढ झाली आहे. नोव्हेंबर, डिसेंबरात झालेल्या अवकाळी पावसाने मसाले, मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने दर वाढले आहेत. देशातील विविध भागातून मसाल्याचे उत्पन्न घेतले जाते. तसेच सिंगापूर, इंडोनेशिया या ठिकाणांहूनही फूल, धने अाणि जिरे आयात केले जाते.

मसाला पीक काढण्याच्या तयारीत असताना नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने घोळ केला. काढणीवर आलेली मिरची पावसाने खराब झाली. मिरचीच्या आतील भाग पाण्याने काळवंडल्याने हे पीक फेकून देण्याची वेळ आली. मिरचीसह अन्य मसाला पिकांचीही हीच स्थिती होती. पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारात मिरचीसह अन्य मसाल्यांचा तुटवडा निर्माण हाेऊन मसाल्याचे दर वाढले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मिरचीवरही पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे हिरवी मिरची १०० रुपयांपर्यंत पाेहाेचली.


मसाल्याचे किलाेचे दर
जिरे २५० ते २७०
धणे १४० ते २४०
शेप १८० ते २२०
हळद १८० ते २००
लवंग ८०० ते १०००
मिरे ६०० ते १२००
बाजा ८०० ते ९००
दालचिनी ६०० ते ७००
विलायची १३०० ते १४००
वेलदोडा १७०० ते २२००
तिखट २४० ते ४००