महागाईचा तडाखा : सर्वांची लाडकी ऍक्टिव्हा महागली
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । भारतात सर्वात जास्त चालणारी स्कुटर कोणती तर ती म्हणजे ऍक्टिवा. देशातील सर्व कुटुंबांमध्ये एक्टिवा वापरलीच जाते. सर्व सामान्य कुटुंबाला हि स्कुटर परवडते म्हणून हि स्कुटर संपूर्ण भारतात सर्वात जास्त विकली जाते किव्वा तीचा खप सर्वात जास्त आहे.मात्र आता हीच ऍक्टिव्हा महागणार आहे. यामुळे आता सर्वांनाच महागाईचा तडाखा बसणार आहे.
या महिन्याच्या अखेरीस होंडा सर्व भारतीयांना एक वाईट देणार आहे. ती म्हणजे ऍक्टिवा महागणार आहे. होंडा कंपनीने आपल्या स्कूटर आणि बाइकच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने Dio आणि Grazia या लोकप्रिय स्कूटर अॅक्टिव्हासह महाग केले आहे.दुसरीकडे, याने सर्वाधिक विकले जाणारे CB Shine, Livo, CD 100, SP 125, X-Blade, Hornet महाग केले आहे.
संपूर्ण भारतामध्ये स्कुटरच नाव घेताच सर्वांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडतो तो म्हणजे ऍक्टिवा. याच नावाचा फायदा घेत होंडा आपल्या ऍक्टिवाला इलेक्ट्रिक व्हेईकलचे रूप देत लोकांसमोर आणणार आहे.मात्र सध्या जी पेट्रोलवर चालणारी ऍक्टिव्हा महागणार आहे. मात्र तथापि, कंपनीने CB 350 DLX च्या काही प्रकारांच्या किमती वाढवल्या नाहीत. एकूणच, आता होंडा स्कूटर 6,396 रुपयांपर्यंत आणि बाइक्स 17,340 रुपयांपर्यंत खरेदी करणे महाग झाले आहे.