जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथे नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ’इंडक्शन प्रोग्राम’चेआयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स), (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स) आणि (मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला . संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सिलिकॉन व्हॅली, टेक्सस्ट, आयटी हब कॉर्पोरेट मध्ये २० % लोक हे भारतातून असतात त्यात महाराष्ट्रातील संख्या पण लक्षणीय आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले, तुम्ही हे प्रोफेशनल कोर्स का केले पाहिजे याबाबत माहिती त्यांनी दिली.

त्याचबरोबर मॅनेजमेंट आणि डिसिजन हे किती महत्त्वाचे आहे याबद्दल सविस्तरपणे चर्चा केली प्लेसमेंट, सॉफ्ट स्कील हे तुमच्याकडे असले पाहिजे कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे. आपल्या इन्स्टिट्यूट मधून आजवर सतरा विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे, अद्यावत असे रिसर्च सेंटर आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यानंतर त्यांनी गोदावरी फाउंडेशन बद्दल थोडक्यात माहिती दिली.






