राष्ट्रीय

प्रतीक्षा संपली! ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, कोणाला संधी? कोणाला डच्चू मिळाला?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२५ । आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर शुभमन गिलची (Shubman Gill) उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील पत्रकार परिषदेतून अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली. India squad announced for ICC Champions Trophy

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात न खेळवता युएईत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी ८ पैकी ६ संघांनी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली होती. आता भारतीय संघानेही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे.

टीमध्ये कोणाला स्थान?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि रिषभ पंतसारख्या स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरला कमबॅक करण्याची संधी दिली आहे. मोहम्मद सिराजला या स्पर्धेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर अर्शदीप सिंगला देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

टीम इंडियाचं वेळापत्रक
इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई
सेमी फायनल-1, 4 मार्च, दुबई
सेमी फायनल-2, 5 मार्च, लाहोर
फायनल, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई
10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button