⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

IND vs SA: द.आफ्रिकेविरुद्धचा पाचवा T20 सामना होऊ शकतो रद्द ; जाणून घ्या कारण?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती, पण त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत पुनरागमन केले. आता भारतीय संघाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, मात्र आज (19 जून) होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. India vs South Africa

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यात पावसामुळे रद्द होऊ शकतो. हवामान खात्यानुसार, कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज पावसाची शक्यता आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे रणजी ट्रॉफीच्या सामन्यांवरही परिणाम झाला आहे. पाऊस थांबला नाही, तर या दोघांनाही संयुक्तपणे विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 11 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला 8 सामने जिंकण्यात यश आले आहे. भारतीय संघ आजपर्यंत आफ्रिकन संघाविरुद्ध त्यांच्या घरी मालिका जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे.

सर्वांच्या नजरा कार्तिकवर असतील
शेवटच्या टी-20 सामन्यात दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी केली. त्याने 27 चेंडूत 55 धावा केल्या. त्याच्यामुळेच टीम इंडियाला सामना जिंकता आला. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल हे दोघे कशी गोलंदाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. यावर सामन्याचा निकाल बरेच अवलंबून असेल.