⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अंजनी धरणाच्या जलसाठ्यात वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । जवळपास १२ ते १३ वर्षांपासून सिंचनाचा अत्यल्प लाभ असलेला व एरंडोल-कासोद्यासारख्या मोठ्या गावांसह काही गावांना पिण्याच्या पाण्याची सुध्दा येणार्या अंजनी मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात १५ऑगस्ट २०२१ पासूनच्या ५ दिवसांत ८.८० टक्के पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे.

आतापर्यंत धरणात एकूण ८.२७ द.ल.घ.मी इतका पाणीसाठा असल्याची माहीती अंजनी मध्यम प्रकल्पाचे सहायक अभियंता श्रेणी-१ सी.आर.बनसोड यांनी दिली आहे.

गेल्या २४ तासांत १.५४टक्के पाणीसाठा वाढल्याचे सांगण्यात आले. अंजनी नदी च्या उगम परीसरात व धरणाच्या पाणलोट क्षेञात मुसळधार पाऊस झाला तर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होऊ शकते. या पार्श्वभुमीवर पाणलोटक्षेञात दमदार पावसाची गरज आहे.
श्रावण सरींचा पाऊस हा जमिनीत जिरणारा असल्यामुळे अजूनही तालुक्यातील ओढे,नाले प्रवाहीत झालेले नाहीत.