राज्यातील मंत्र्यांच्या वाहन खरेदीच्या मर्यादेत वाढ; आता ‘इतक्या’ लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार

सप्टेंबर 18, 2025 7:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्र्यांच्या वाहन खरेदीच्या मर्यादेत पाच लाख रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय वित्त खात्याने घेतला आहे. मागील वर्षी कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्र्यांना २५ लाख रुपयांच्या मर्यादेत वाहन खरेदीची मर्यादा होती. पण आता ही मर्यादा ३० लाख रुपयांवर नेली आहे. राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या पसंतीनुसार वाहन घेता येईल. त्यांच्या मोटारींच्या खरेदीच्या किमतीवर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.

car

राज्य सरकारने मंत्री, राज्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महाधिवक्ता, मुख्य माहिती आयुक्त, राज्यातील सर्व विभागांचे राज्यस्तरीय विभागप्रमुख, जिल्हाधिकारी यांना ही वाढीव मर्यादा लागू होणार आहे. राज्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य, राज्य सेवा हक्क आयुक्त यांच्यासाठीची १७ लाखांची मर्यादा वाढवून २० लाख करण्यात आली आहे.

विभागांचे राज्यातील सर्व यांच्यासाठीची १२ राज्यस्तरीय विभागप्रमुख उदा. आयुक्त, महासंचालक लाखांची मर्यादा वाढवून १७ लाख करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठीची ९ लाखांची मर्यादा वाढवून ती आता १५ लाख करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now