जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । जळगाव मधील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने दादर-भुसावळ-दादर चार विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी जळगाव, धरणगाव, अमळनेरला थांबा असल्याने खान्देशातील प्रवाशांची सोय होणार आहे. या गाडीचे नुकतेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

रेल्वे क्र. ०९०४९ दादर-भुसावळ गाडी व ०९०५० भुसावळ-दादर गाडी दर शुक्रवारी घावणार आहे. या दोन्ही रेल्वेंच्या फेऱ्या २७ जूनपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. ०९०५१ दादर-भुसावळ गाडी व ०९०५२ भुसावळ-दादर रेल्वे गाडी ही सोमवारी, बुधवारी व शनिवारी धावणार आहे. या दोन्ही रेल्वे आता ३० जूनपर्यंत धावणार आहेत. गाडी क्रमांक ०९०४९ आणि ०९०५१ चे बुकींग २९ मार्चपासून सर्व पीआरएस काउंटर्सवर होईल.