⁠ 
[rank_math_breadcrumb]

शेतकऱ्यांना दिलासा! केंद्राकडून गव्हासह 6 पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२४ । केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली असून या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 6 रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत 2 टक्क्यावरून 7 टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 35,000 कोटी रुपयांच्या ‘पीएम अन्नदाता आय संरक्षण अभियान’ला देखील मंजुरी दिली आहे. तसेच यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्के वाढ मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून, ५३ टक्के करण्यात आला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी 24,475 कोटी रुपयांचे नॉन-युरिया खतांवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच गहू आणि मोहरीसह 6 रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत 150 रुपयांनी वाढ करून 2,425 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 210 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या पिकांचा एमएसपी वाढला
गहू : 2275 रुपयांवरून 2425 रुपयांपर्यंत वाढला
बार्ली: रु. 1850 वरून 1980 रु
हरभरा : ५४४० रुपयांवरून ५६५० रुपये
मसूर : 6425 रुपयांवरून 6700 रुपयांपर्यंत वाढले
रेपसीड/मोहरी: 5650 रुपयांवरून 5950 रुपयांपर्यंत वाढले
करडई : 5800 रुपयांवरून 5940 रुपयांपर्यंत वाढले

पीएम अन्नदाता आय संरक्षण मोहीम
पीएम अन्नदाता आय संरक्षण मोहिमेसाठी सरकारने 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने ‘पीएम अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (पीएम-आशा) साठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले.माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे डाळी, तेलबिया आणि इतर आवश्यक कृषी व बागायती वस्तूंच्या उत्पादनात स्वावलंबन वाढेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण होईल, असे ते म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.