---Advertisement---
जळगाव जिल्हा

भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२५ । रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. विशेष या गाड्या भुसावळ मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

train 1 jpg webp

या गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ?
गाडी क्रमांक ०९०२५ बलसाड दानापूर साप्ताहिक विशेष गाडी २३ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०२६ दानापूर बलसाड साप्ताहिक विशेष गाडी १ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०४५ उधना पटना साप्ताहिक विशेष गाडी २७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०४६ पटना उधना साप्ताहिक विशेष गाडी २८ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

---Advertisement---

गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट मेहबूबनगर साप्ताहिक विशेष गाडी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९५७६ मेहबूबनगर राजकोट साप्ताहिक विशेष गाडी ०१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ०९१२९ बांद्रा टर्मिनस रिवा अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी २६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.गाडी क्रमांक ०९१३० रिवा बांद्रा टर्मिनस अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी २७ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment