जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदची बातमी आहे. आयकर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ६२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत Income Tax Bharti 2025

लघुलेखक ग्रेड १ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२५ आहे. Income Tax Recruitment 2025
वयाची अट :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावे. एकूण ६२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.
असा कराल अर्ज
या नोकरीसाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हैदराबाद येथे आयकर आयुक्त कार्यालयात तुम्हाला जावे लागणार आहे. ही निवड प्रतिनियुक्तीवर केली जात आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुख्य आयकर आयुक्त, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, हैदराबाद,१०वा मजला, इन्कम टॅक्स टॉवर्स, ए सी गार्ड्स, मसाब टँक, हैदराबाद ५००००४ येथे अर्ज पाठवायचा आहे.