जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर, आठवीच्या विद्यार्थिनीसोबत शाळेतच भयंकर कृत्य

ऑगस्ट 8, 2023 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । गेल्या काही दिवसापूर्वी एरंडोल तालुक्यातील एका मुलींच्या वसतिगृहात पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता रावेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे खळबळ उडाली आहे.

crime 12 jpg webp

रावेर शहरातील एका शाळेत आठवीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा शाळेतच विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी शाळेच्या संचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
सावदा पोलीस स्थानकात एका इसमाने फिर्याद दिली असून त्यानुसार, त्याची १३ वर्षाची मुलगी ही शहरातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या पाच दिवसापूर्वी या बालिकेला शाळेचा संचालक अकरम खान अमानुल्ला खान याने त्याच्या ऑफिसमध्ये माप घेण्याचे कारण दाखवून बोलावले. याप्रसंगी त्याने विद्यार्थीनीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.

दरम्यान, या कृत्यामुळे प्रचंड भेदरलेल्या विद्यार्थीनीने याबाबत आपले वर्ग शिक्षक फिरोज सर यांच्यासह अर्शद सर यांना माहिती दिली. या दोघांनी शाळेचे मुख्याध्यापक इरफान सर यांना याबाबत माहिती दिली. या तिघांनी सदर बालिकेला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावून ही घटना कुणालाही सांगू नये असे तिला सांगितले. यामुळे ही बालिका खूप घाबरली. यानंतर दोन-तीन दिवस ती शाळेतच गेली नाही. यावरून तिच्या आईने विचारणा केली असता या विद्यार्थीनीनी तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्याने या घटनेची वाच्यता झाला. यानंतर मुलीच्या पालकांनी सावदा पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार चौघांच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४-ए (१)(आय), १४ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ आणि १७ अन्वये सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल
या प्रकरणी सदर शाळेचे संचालक अकरम खान अमानुल्ला खान (रा. रजा नगर, सावदा), याच्यासह इरफान खान जमशेर खान (रा. रजा नगर सावदा), शेख फिरोज (पूर्ण नाव माहित नाही) तसेच शेख अरशद (पूर्ण नाव माहित नाही). दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत कुणा आरोपीला अटक झाली नसल्याचे वृत्त होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now