शिरसोली येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शाखेचे उद्घाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत मंत्री श्री. योगेश्वरजी गर्गे उपस्थित होते. या वेळेस त्यांनी सांगितले की राष्ट्र, धर्म रक्षण तसेच सेवा, सुरक्षा, संस्कार हा अजेंडा घेऊन समाजात काम करायचे आहे. सोबत उपस्थित जील्हामांत्री श्री. देवेंद्र भावसार जिल्हा संयोजक राजेश नन्नवरे , समाधान पाटील , राजेश

गांगुर्डे तसेच तेथील नूतन शाखेतील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात शिरसोली शाखा समिती गणेश गोपाल बारी -संयोजक, राहुल संजय पाटील सह संयोजक, अशोक वासुदेव बारी -गोरक्षक प्रमुख, महेश अरुण पाटील – आरती प्रमुख, मधुकर पांडुरंग खलसे – सुरक्षा प्रमुख , पियूष भिला ताडे -महाविद्यालय संपर्क प्रमुख आदींची निवड करण्यात आली.