⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मंगळग्रह सेवा संस्था, रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

मंगळग्रह सेवा संस्था, रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे महाआरोग्य शिबिराचे मंगळ ग्रह मंदिर येथे २९ऑक्टोबर रोजी उदघाटन झाले. खासदार उन्मेष पाटील अध्यक्ष स्थानी होते. हे शिबीर ३१ ऑक्टोबर पर्यंत आहे. सुमारे पंधराशे रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळणार आहे.

यावेळी व्यासपीठावर आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ,अखिल भारतीय रेड स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कोते, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष बारणे,सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे,रोशन मराठे,संचालक भास्करराव काळे, निवेदक भाऊसाहेब कोकाटे,जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश झाल्टे,प्रकल्प संचालक नंदू रायगडे, विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य दिलीप पाटील,जि.प.सदस्य प्रताप पाटील, डॉ. हर्षल माने,सदस्या जयश्री पाटील,खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, प्रा. अशोक पवार,बन्सीलाल भागवत उपस्थित होते .

प्रास्ताविक रोशन मराठे यांनी केले .यावेळी उन्मेष पाटील, अनिल पाटील, अशोक शिंदे, सुरेश कोते, संतोष बारणे, स्मिता वाघ यांनी मंगळग्रह सेवा संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले.
शिबिरासाठी नोंदणी केलेल्या रुग्णांवर मोफत उपचार व औषधे वाटप झाले. लाखो रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी पात्र रुग्णांची नोंदणी करण्यात आली. त्यांना कोणत्या दिवशी, कोठे शस्त्रक्रिया होणार ? याविषयी लवकरच कळविले जाणार आहे. शिबिरात स्थानिक तसेच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत आहेत.

शिबिराच्या यशवितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाध्यक्ष एस.एन.पाटील,सचिव एस.बी.बाविस्कर,सहसचिव दिलीप बहिरम,खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त जयश्री साबे, आनंद महाले डी. ए.सोनवणे तसेच सर्व सेवेकरी परिश्रम घेत आहेत.
डीगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह