भुसावळ शहरात ठाकरे गटाच्या चार शाखांचे उद्घाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे शहरातील विविध भागात सेनेच्या चार शाखांचे उद्घाटन शहर प्रमुख दिपक धांडे व कार्यकारणी सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यात हंबर्डीकर चौक, जुना सातारा तसेच मोहित नगर व जामनेर रोडवरील संस्कार रेडीमेड समोरील शाखेचा समावेश आहे. याप्रसंगी काही पदाधिकार्यांच्यादेखील नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी संपर्क प्रमुख सुरेश राणे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शहर प्रमुख निलेश महाजन, भुसावळ तालुका प्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख दिपक धांडे, भुसावळ शहरप्रमुख हेमंत खंबाईत, रेल कामगार सेनेचे ललित मुथा, योगेश बागुल, जग्गू खेराडे, स्वप्नील सावळे, राकेश खरारे, सोनी ठाकूर, जवाहर गौर, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे, शांताराम बैलांम, निलेश शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.