प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पनवेलसह छपरा दरम्यान धावणार ‘विशेष ट्रेन’

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे. 05194 विशेष गाडी 2 नोव्हेंबर रोजी पनवेल येथून 10.50 वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसर्‍या दिवशी 8.50 वाजता पोहोचेल तर 05193 विशेष गाडी 1 नोव्हेंबर रोजी छपरा येथून 15.20 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसर्‍या दिवशी 21.00 वाजता पोहोचेल. यागाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर, बलिया या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

याचबरोबर मुंबई, पुणे आणि दानापूर दरम्यान सहा अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-दानापूर अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल
01411 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल 2 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.55 वाजता सुटल्यानंतर दानापूर येथे दुसर्‍या दिवशी सायंकाळी पाच वाजता पोहोचणार आहे. 01412 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल 3 नोव्हेंबर 2022 रोजी दानापूर येथून 7.55 वाजता सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी रात्री 11.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.

पुणे-दानापूर अनारक्षित महोत्सव विशेष
01415 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल सोमवार, 31 रोजी आणि 3 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे येथून रात्री 12.10 वाजता सुटेल व दानापूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता पोहोचणार आहे. 01416 अनारक्षित सुपरफास्ट स्पेशल 1 व 4 नोव्हेंबर रोजी दानापूर येथून 11 वाजता सुटल्यानंतर पुणे येथे दुसर्‍या दिवशी 4.30 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.