डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ व्या राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ
आरोग्याच्या अधिकाराच्या दिशेने सीमांचा विस्तार करणे अन् अंतर भरून काढणे यावर मंथन
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२५ । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला.यानंतर मान्यवरांचे हस्ते सोव्हेनियरचे प्रकाशन करण्यात आले. तीन दिवस असलेल्या या परिषदेत आरोग्याच्या अधिकाराच्या दिशेने सीमांचा विस्तार करणे अन् अंतर भरून काढणे या विषयावर मंथन केले जाणार आहे.
पब्लीक हेल्थ फाउंडेशनचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, गोदावरी फाउंडेशचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, आयएपीएसएमचे सचिव डॉ. पुरूषोत्तम गिरी, आयपीएचएचे राज्याध्यक्ष डॉ. प्रसाद वैंगणकर, सचिव डॉ. दीपक खिसमतराव, डॉ. हर्षल पांढवे, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. परिषदेच्या सुरूवातीला अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. प्रसाद वैंगणकर, डॉ. सुभाष साळुंके, डॉ. पुरूषोत्तम गिरी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी परिषदेच्या आयोजनाबद्दल आयोजक टीमचे कौतुक केले.
तसेच या परिषदेच्या माध्यमातून विविध विषयांवर चर्चा विमर्श करून एक चांगला सार निर्माण होईल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह महाविद्यालयातील डॉक्टर्स, डीन, प्राध्यापक उपस्थित होते. परिषदेच्या सुरूवातीला आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मीता कोल्हे यांची प्रकट मुलाखत घेतली. यात डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मीता कोल्हे यांनी त्यांचा जीवनपट उलगडत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव कथन केले. शनिवार दि १७ रोजी सायंकाळी समारोप केला जाणार आहे.