जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२। फसवणूक होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच जळगावातील एका प्रौढाची क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाच्या नावाखाली भामट्यांने त्यांच्या खात्यातील ३० हजार ९३७ रुपये परस्पर वळवून घेतले.
प्रवीणकुमार दशरथ खरात (वय ४४, रा. अयोध्यानगर) यांची फसवणूक झाली आहे. खरात हे वाहनचालक आहेत. त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये एसबीआयकडून क्रेडिट कार्ड हवे आहे का? अशी विचारणा झाली होती. त्यावर त्यांनी होकार दिला. यानंतर त्यांच्या घरी एक अनोळखी तरुण आला. त्याने व्हेरिफिकेशनच्या नावाने खरात यांचे आधार, पॅनकार्ड स्कॅन केले. त्यानंतर जानेवारी महिन्यात खरातांना पोस्टाने क्रेडिट कार्ड मिळाले.
कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांकावर फोन केला असता समोरील व्यक्ती बंगाली भाषेत बोलत होती. त्यामुळे खरात यांनी कस्टमर केअरवर फोन केला. या वेळी समोरील व्यक्तीने एनीडेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानुसार खरात यांनी अॅप डाऊनलोड केले. मोबाइलवर आलेला ओटीपी सांगितला. ही प्रक्रिया सुरू असतानाच खरात यांच्या बँक खात्यातून ४ वेळा करून ३० हजार ९३७ रुपये परस्पर वळते हाेऊन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा