जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर येथे विरचंद रुपचंद रेदासनी प्रवचन हॉल मध्ये सकल जैन समाज व नवकार जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जैन बांधवांतर्फे सत्कार स्विकारून, प्रवचनाचा लाभ घेतला तसेच उपस्थित जैन बंधु-भगिनींशी संवाद साधला.
यावेळी धिरज जैन, अभय (बंटी) भन्साली, दर्शन जैन, सुमित बागरेचा, रुपेश गुजराती, ललित लुनावत यांच्यासह समस्त जैन बांधव उपस्थित होते.