⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जिवनात आचरण व प्रेमात अंतकरण महत्त्वाचे असते – अरुणभाई गुजराती

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । साहित्यात व्याकरण आवश्यक असले तरी जिवनात मात्र आचरण आवश्यक असते आणि प्रेमात अंतकरण, जिवनात संवाद संपला की, आंनद संपतो हा संवाद सुरु राहण्यासाठी साहित्य महत्वाची भूमिका बजावते. साहित्य आणि आई या दोन संस्था टिकल्या पाहिजे. साहित्यातून प्रेम वाढायला पाहिजे. जे साहित्य समाजामध्ये द्वेष निर्माण करते. माणसा माणसात अंतर निर्माण करते त्याला साहित्य म्हणता येत नाही. असे प्रतिपादन विधानसभाचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी केले.

एरंडोल येथे औदूंबर साहित्य रसीक मंचतर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार चिमणराव पाटील, डॉ.अनिल लोहार, डॉ.के.ए.बोहरी, डॉ.पिंगळे, डॉ. तुळशीराम गुट्टे, अनुराग वाजपेयी, सि.के. पाटील, औदुंबरचे अध्यक्ष ऍड. मोहन शुक्ला आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आ. चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या साहित्यात आणण्याचे साहित्याकांना आवाहन केले. शेतकरी अनुदानावर जगणार नाही त्याला फक्त पुरेश्या प्रमाणात विज आणि त्याने केलेल्या कष्टाच्या मालाला योग्य भाव दिला तरी शेतकरी कठीण परिस्थितीत तगू शकतो. असे प्रतिपादन चिमणराव पाटील यांनी केले.

यावेळी आनंद दाभाडे, ऍड.आर.के साळी, देवेंद्र साळी, युवराज माळी, नाना महाजन, स्वाती पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जैन उद्योग समुहाचे संस्थापक पद्मश्री भंवरलाल जैन लिखित “ती आणि मी” या ग्रंथावर ज्ञानेश्वर शेंडे यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच पुण्याचे बंडा जोशी यांच्या एक पात्री नाटकाने रसिकांना निर्मळ आनंदाची मेजवानी दिली.
औदूंबरचे अध्यक्ष ऍड. मोहन शुक्ला व नंदा शुक्ला या दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्षमा साळी यांनी केले. साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी औदूंबरचे अध्यक्ष ऍड. मोहन शुक्ला, सचिव ऍड. विलास मोरे, उपाध्यक्ष प्रा. वा.ना. आंधळे व अरुण माळी, स्वागताध्यक्ष अमित पाटील, कार्याध्यक्ष प्रविण महाजन, कोषाध्यक्ष सैय्यद जाकीर हुसेन, निंबा बडगुजर, रविंद्र लाडगे, भिमराव सोनवणे, पी.जी. चौधरी, विजय जाधव आधींनी परिश्रम घेतले.