बोरखेड्यात किरकोळ वादातून एकाला मारहाण

ऑक्टोबर 26, 2022 12:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे शुल्लक कारणातून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 29T132011.945 jpg webp

सविस्तर वृत्त असे की, दि २४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्वप्नील गोरख पाटील(वय २३) यांचे वडील यांना त्यांच्याच प्लॉटमध्ये जाण्यास रस्ता न दिल्याने त्यांनी याची विचारणा केली. याचा राग आल्याने त्यांना वसंत जयराम पाटील, समाधान वसंत पाटील, राहुल वसंत पाटील, बेबाबाई वसंत पाटील यांनी काठीने मारहाण केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मोती पवार हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now