⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

अमळनेरमध्ये पालिकेतर्फे माेठ्या गटारींचीही केली जातेय स्वच्छता‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । अमळनेर‎ शहारत दरवर्षी पावसाळ्यात पिंपळे आणि‎ ढेकू रोड वर असलेल्या नाल्यामुळे‎ या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी ‎साचते. त्यामुळे या परिसरातील ‎नागरिकांना मोठा त्रास सहन करावा ‎लागताे. या संदर्भात पालिकेने‎ व्यापक मोहीम हाती घेऊन पिंपळे ‎नाल्याची स्वच्छता करण्यास‎ सुरुवात केली आहे. पावसाळ्यात‎ या नाल्यात पाणी साचणार नाही,‎ असे नियोजन पालिकेने केले आहे.‎

ढेकू व पिंपळे रोड परिसरात‎ पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या‎ प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे‎ रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त होऊन‎ ‎वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.‎ तर काही रहिवाशांच्या घरात पाणी‎ घुसून संसारोपयोगी साहित्याचे मोठे‎ नुकसान होते. मंगरूळ शेत‎ शिवारातून हा नाला शहरातून वाहत‎ जातो. या नाल्यावर बऱ्याच ठिकाणी‎ ‎नागरिकांनी अतिक्रमण करून‎ अडवल्याने पाणी कॉलनी परिसरात‎ घुसते. पालिका प्रशासन त्यावेळी‎ मोहीम राबवून पाणी पास करते.‎ मात्र, यावर ठोस कारवाई व्हावी,‎ यासाठी पालिकेच्या प्रशासक सीमा‎ ‎अहिरे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे‎ यांनी नाल्यात साचलेला गाळ काढून‎ सफाई सुरू केली आहे. मंगरूळ‎ शिवारकडून येणारा हा नाला आर.‎ के. पटेल कारखान्यामागून येऊन पुढे‎ शेतकी संघाच्या बाजूने येतो व पुढे‎ तो धुळे रस्त्याकडून जाऊन पिंपऱ्या‎ नाल्याला मिळतो. पावसाळ्यात या‎ नाल्यामुळे रहिवासी वस्तीत पाणी‎ साचत असल्याने त्याची सफाई व‎ त्याचे खोलीकरण केले जात आहे.‎ तसेच पाण्याला निर्माण होणारे‎ अडथळे मोकळे करून पाणी‎ शहरात घुसणार नाही, अशी‎ उपाययोजना केली जात आहे.‎ शहराच्या मध्यवर्ती भागातून‎ जाणाऱ्या पिंपऱ्या नाल्याच्या‎ पाण्याला अडथळा निर्माण होऊन‎ त्याचे पाणी ही वस्तीत शिरते.‎ त्यामुळे त्याचे ही खोलीकरण, गाळ‎ काढण्याचे व शहरातील मोठया‎ गटारीवर सिमेंटचे ढाबे टाकण्यात‎ आले आहेत.‎