लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; खात्यात खटाखट ₹३००० येणार

डिसेंबर 11, 2025 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२५ । राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आलीय. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असताना लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरच नव्हे तर डिसेंबरचाही हप्ता एकत्रित जमा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकत्रित ३००० रुपये जमा होतील ही महायुती सरकारची सुनियोजित रणनीती असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले

ladki bahin

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून आचारसंहितेदरम्यान कोणत्याही प्रकारची वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्यात खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत.

लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित पाठवला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या निर्णयाचा महायुती सरकारला फायदा होऊ शकतो असे देखील मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now