⁠ 
रविवार, मे 19, 2024

जान है तो जहान है..! लॉकडाऊनच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री टोपेंचं महत्त्वाचं विधान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. कोरोनासह ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याचे चिन्ह आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सध्याच्या घडीला राज्य सरकार लॉकडाऊनचा कोणताही विचार करत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही.

लॉकडाऊनचा परिणाम हा अर्थकारणावर होतो, गरिबांना त्याचा फटका बसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीवर याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावेळी तुर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण संसर्ग खूपच वाढला आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कन्झ्मशन होऊ लागलं, की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळे लॉकडाऊन बाबत गैरसमज ठेवू नका, असंही ते म्हणालेत. लॉकडाऊनची सध्यातरी शक्यता नाही, मात्र निर्बंध अधिक कडक होतील, असंदेखील राजेश टोपे यांनी म्हटलंय. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग वाढतोय. रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे नियम कठोरपणे पाळले गेले पाहिजेत. संख्या वाढू नये, संसर्ग वाढू नये, यासाठीचे उपाय करणं हे पहिलं प्राधान्य आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

तर निर्णय घेऊच!
लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. लॉकडाऊनची झळ प्रत्येकाला बसली आहे. जान है तो जहान है. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, यालाच आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केलाय.

आज एक टप्पा आपण ठरवून दिलेला आहे. मर्यादा घातलेल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम एक दोन दिवसात दिसेल. यावरुन नियंत्रणात आलं, तर ठीक, नाहीतर अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंदेखील पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा :