⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच; तळकोकणात ‘या’ तारखेला दाखल होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । यंदाच्या मान्सूनबाबत हवामान खात्याकडून दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता भारतात मान्सून कधी दाखल होणार यांची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. यातच हवामान मान्सून खात्याने वेळेपूर्वी म्हणजेच 31 मे रोजीच केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
गेल्या वर्षी मान्सून 4 जून रोजी दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मात्र मान्सून 4 दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळात दाखल झाला होता. तर राज्यात 11 जून रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं. यंदा मात्र 7 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता यंदा मान्सून दिलेल्या अंदाजाप्रमाणे दाखल होतो का हे पहावं लागेल.

यंदा 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता
विविध मॉडेल्स आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होत असून ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यावेळी देशात चांगल्या पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंदी महासागराच्या पट्ट्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्याचा परिणाम नैऋत्य मान्सूनवर होऊन यावेळी देशात सरासरीपक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असं भारतीय हवामान खात्याने या आधीच सांगितलं आहे.