⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

प्रतीक्षा संपणार! 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात शिक्षण मंडळाने दिली महत्वाची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । महाराष्ट्र राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी वर्ग आणि पालकांमध्ये आहे. अशातच शिक्षण मंडळाने एक अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल तर इयत्ता दहावीचा निकाल मेच्या चौथ्या आठवड्यात लागणार आहे. मंडळाने अजून तारखा जाहीर केलेल्या नाहीत. कोणत्या आठवड्यात निकाल जाहिर होणार हे सांगण्यात आलंय.

विद्यार्थ्यांसह पालकांना निकाल घरबसल्या पाहता यावा या करिता साधारण पाच ते सहा संकेतस्थेळ उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे (mahahsscboard.in) आणि (mahresult.nic.in) तसेच (results.gov.in) या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.

बारावीचा निकाल जवळपास २१ किंवा २२ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली असून निकालाची अंतिम तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र बोर्डाने २०२४ या वर्षी १ ते २६ मार्च या कालावधीत दहावीच्या परिक्षा घेतल्या होत्या तर त्यानंतर बारावीच्या परिक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडल्या होत्या. आता या परीक्षांचा निकाल बोर्डाकडून लवकरच जाहीर केल्या जातील शिवाय पुरवणी परीक्षाही वेळेत घेण्यात येऊन या परिक्षेचे निकाल लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. असेही सांगितले जात आहे. दरम्यान यंदा राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या काॅपीमुक्त पार पडल्या आहेत. यंदाच्या निकालामध्ये मुली वरचढ ठरतात की, मुले बाजी मारतात हे पाहण्यासारखे ठरेल.

दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी…
१. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
२. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.
३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा.
४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.
५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल.