⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

१ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम ; जाणून घ्या अन्यथा होईल आर्थिक नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । ऑगस्ट महिना सुरु होण्यास अवघे दोन दिवस उरले आहे.  या नवीन ऑगस्ट महिन्यात अनेक नियम बदलले जाणार आहेत. असे अनेक काम आहेत जे पूर्ण करण्यासाठी सरकारने अंतिम तारीख ३१ जुलै दिली आहे. या शिवाय काही नियम असे आहेत जे ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे हे नवे निमय काय आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे. जर हे नियम समजून घेतले नाही आणि संबंधित कामे केली नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.  

१) आरबीआयने एटीएम व्यवहारासाठी इंटरचेंज फी प्र्त्येक फायनान्शियल ट्रान्जॅक्शनवर 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत वाढवले आहे. नॉन फायनान्शियल ट्रान्जॅक्शनसाठी शु्ल्कात 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. 1 ऑगस्टपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होईल.

२) शातील ऑइल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपपीजी गॅस सिलिंडच्या किमतीत बदल करते. त्यामुळे एक ऑगस्टपासून घरगुती (LPG) गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत.  

३) ०१ऑगस्ट २०२१ पासून राष्ट्रीय स्वयंचलित क्लियरिंग हाऊसेस (NACH) आरबीआयकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही एक बल्क पेमेंट सिस्टम आहे, जी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे चालविली जाते. याद्वारे लाभांश, पेन्शन आणि पगार बहुतेक लोकांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. या प्रणालीद्वारे वीज, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाची ईएमआय, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आणि विमा प्रीमियम भरला जातो.

४) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने जाहीर केले आहे की, आता घरपोच सेवांवर अधिक शुल्क आकारले जाईल. आता 01 ऑगस्ट 2021 पासून प्रत्येक घरपोच सेवेसाठी 20 रुपये अधिक जीएसटी द्यावे लागतील. आतापर्यंत यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते. घरपोच सेवेदरम्यान ग्राहक किती व्यवहार करू शकतो, याची मर्यादा असणार नाही.

५) खासगी क्षेत्रातील सर्वात प्रमुख बँक म्हणजेच आयसीआयसीआय बँक रोख व्यवहार, एटीएम इंटरचेंज आणि चेक बुकच्या मर्यादेतही सुधारणा करीत आहे. हे शुल्क 01 ऑगस्ट 2021 पासून लागू केले जाईल. बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांना दरमहा 4 मोफत व्यवहारांची सुविधा मिळेल. मोफत मर्यादेनंतर प्रति व्यवहार 150 रुपये आकारले जातील.