जळगाव शहर

जळगाव कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, हे काम त्वरित करा, अन्यथा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । तुम्ही जर राज्य शासनाचे निवृत्त वेतन धारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जळगाव कोषागारातुन निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे 70 वर्षे वयावरील निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक तसेच इतर राज्याचे 70 वर्षे वयावरील शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन धारक यांना दिनांक 1 ते 28 फेबुवारी, 2022 या काळात आपण मूळ निवृत्तीवेतन तसेच पती/पत्नी यांची पुढीलप्रमाणे तपशिल – नाव, संपर्क क्रमांक, बँक, ब्रांच , खाते नंबर इ. एका कागदावर नमूद करुन यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक प्रथम पानाची छायांकित प्रत जोडून जिल्हा कोषागार कार्यालय जळगाव येथे कार्यालयीन वेळेत आणून जमा करावे.

ज्यांना शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या [email protected] या ई-मेलवर अथवा इतर व्यक्तीकडे पाठवून द्यावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श.वा. निकुम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button