पैशांसाठी विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

जून 13, 2022 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 13T124638.838 jpg webp

शहरातील विवेकानंद नगरातील माहेर असलेल्या राधिका देवेंद्र तायडे (वय-३२) यांचा विवाह जळगावातील दिक्षित वाडी येथील देवेंद्र किशोर तायडे यांच्याशी रितीरिवाजानूसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती देवेंद्र याने पत्नीला माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान, विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पतीसह सासू, सासरे, दिर यांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी १२ जून रोजी विवाहितेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पती देवेंद्र किशोर तायडे, सासू सविता किशोर तायडे, सासरे किशोर चुडामन तायडे आणि दीर पंकज किशोर तायडे सर्व रा. वानखेडे, सोसायटी, दिक्षीत वाडी जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस नाईक अलका शिंदे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now