मुक्ताईनगरमधील खनिज उत्खनन प्रकरणावर महसूल राज्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

मार्च 24, 2026 12:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर तालुक्यातील (जि.जळगाव) मौजे हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयामार्फत ईटीएस मोजणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. या मोजणीचा अहवाल आल्यानंतर या संदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल, असे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

khanij

सदस्य शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना विधान परिषदेत उपस्थित केली होती.

महसूल राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, हरताळे या ठिकाणी गायरान जमिनीवरील उत्खनन प्रकरणात प्रथमदर्शनी अनियमित उत्खनन झाल्याचे आढळून आल्याचे दिसून येत नाही. तसेच त्या ठिकाणी झालेले ब्लास्टिंग हे जलसंपदा विभागाकडून धरणाच्या कामासाठी अधिकृत परवानगीने करण्यात आले होते. त्यामुळे या ब्लास्टिंगचा उत्खननाशी थेट संबंध नसल्याचे महसूल राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

गौण खनिज उत्खनन प्रकरणी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून त्यांच्या अहवालानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही महसूल राज्यमंत्री कदम यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडताच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली. दोन्ही धातुंचे दर धड्डाम कोसळल्याने सणासुदीसह लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सुवर्ण व्यावसायिकांनीही खरेदी-विक्री वाढल्याने समाधान व्यक्त केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now