लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मे महिन्याच्या हप्त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्वाची माहिती

मे 28, 2025 3:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२५ । राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. दरमहा १५०० रुपये पात्र महिलांच्या थेट खात्यात जमा होत आहे. आतापर्यन्त १० हप्ताचे पैसे मिळाले असून एप्रिल २०२५ चा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला होता. आता मे महिना संपत आला. तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे १५०० रुपये जमा झाले नाहीय. मे महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागले असून अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

New Project 3 3

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी 3.37 कोटींच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील. असं ते म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी 25 ते 30 किंवा 31 तारखेपर्यंत जमा झाले आहेत. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील महिनाअखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपण्यास आता फक्त ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment